केंद्राच्या ‘या’ योजनेतून डफळापूरमध्ये होणार संवर्धनाचे काम

0
2
भूजल संवर्धन, व्यवस्थापन धोरणे कार्यक्रम संपन्न

 

डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे भूजल संवर्धन आणि व्यवस्थापन धोरणे कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय,केंद्रीय भूजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर या विभागाकडून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन डफळापूर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सुभाषराव गायकवाड यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी भूजल सर्वेक्षण विभाग कोल्हापूरचे उपअभियंता निलेश जाधव,प्रमुख पाहुणे सुभाषराव गायकवाड,कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित माधनपुरे,सायली टेम्भूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित माधनपुरे म्हणाले,पाण्याचे महत्व ओळखून केंद्र सरकारने भूजल संवर्धन व व्यवस्थापने धोरणे हा व्यापक कार्यक्रम सुरू केला आहे. विविध संस्था,पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी व नागरिकां समवेत जलविज्ञान,जलविद व पाऊस पाणी साठवण या मुलभूत बाबीचे ज्ञान नागरिकांना या कार्यक्रमाद्वारे आम्ही देणार आहोत.डफळापूर येथे हा कार्यक्रम दिर्घकाळ राबविण्यात येणार आहे.गावातील पाणी पातळी वाढविणे,प्रभावी जलस्ञोत निर्माण करणे,पावसाला पूरक वातावरण निर्माण करणे,पाण्याची बचत करणे,योग्य व समतोल वापर या बाबीची नागरिकांत प्रसार व प्रचार करून त्यांना जागृत्त करणे हे आमच्या या कार्यक्रमाचे धोरण असल्याचे यांनी सांगितले.
श्री.अमरनाथ म्हणाले, पाण्याची बचत केली नाही तर एकदिवस पाणी संपू शकते. प्रत्येकाला केवळ पिण्यासाठीच नव्हे तर जगण्यासाठी आवश्यक असलेले धान्य पिकविण्यासाठीही पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. पाण्याच्या गैरवापरामुळे मनुष्याच्या अस्तित्वाला उपयुक्त ठरणारे मासे आणि इतर जलचरांना धोका निर्माण होत आहे. तसेच पाण्याच्या बचतीमुळे पृथ्वीचा समतोल साधला जातो.त्यामुळे शासनाचा जल संवर्धनाच्या कार्यक्रमात शेतकरी, नागरिकांनी पुर्ण क्षमतेने सामील होऊन प्रभावी कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
उपअभियंता निलेश जाधव म्हणाले,
हा कार्यक्रम जल साक्षरतेचा भाग आहे. प्राथमिक शाळा पातळीपासून सुरू केला पाहिजे जेणेकरून विविध वापरकर्त्यांमध्ये पाण्याच्या वापराचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व कसे आहे याविषयी जागरूकता निर्माण होऊ शकेल.
भूगर्भातील पाण्याचे क्षेत्र पुष्कळ खाली गेलेल्या ठिकाणी जल संवर्धनाची कामे प्रथम प्राधान्याने घेतली जातील आणि केंद्र सरकारने हा परिसर डार्क झोन म्हणून घोषित केला आहे.सिंचन हेतूने पाणीपुरवठा अपुरा व अनियमित असेल तेथे पूर्ण झालेल्या मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या अधिकार क्षेत्रामधील जल संवर्धन कामे (ग्रामीण तलाव, पाझर तलाव आणि कोल्हापूर प्रकार बंधारा) हाती घेण्यात येतील.
सायली टेम्भूर्णे म्हणाल्या,सोप्या भाषेत सांगायचे तर, जलसंवर्धन हे पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करून त्याचा अपव्यय किंवा अनावश्यक वापर कमी करण्याचे तंत्र आहे. ताजे, स्वच्छ पाणी हे आता मर्यादित स्त्रोत मानले जात असल्याने, जलसंधारण महत्त्वाचे आणि अत्यावश्यक बनले आहे.उपस्थित नागरिक,माजी सैनिक,महिला न नागरिकांना माहिती देण्यात आली.विविध मान्यवरांचा स्मृत्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन,प्रस्तावित सायली टेम्भूर्णे यांनी केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here