कामगार मंत्री : सिटु सलग्न, बांधकाम कामगार फेडरेशनच्या शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : बांधकाम कामगाराना सोईची असणारी मेडीक्लेम योजना व गृहनिर्माण योजना राबवणार असल्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी लाल बावटा बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) च्या शिष्टमंडळाला दिले.मंत्रालयात आयोजि बैठकीत ते बोलत होते.सिटु संलग्न राज्य फेडरेशनने दि ११ सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे निवासस्थानावर मोर्चा आयोजन केले होते.त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये बांधकाम फेडरेशन (सिटु) चे प्रमुख पदाधिकारी व कामगार विभागाचे सर्व सचिव यांची संयुक्त बैठक मंत्रालयामध्ये आयोजित केली होती.या बैठकीमध्ये, ७ ऑगस्ट २०२३ रोजी तपासणी ते उपचार असे परीपत्रक काढण्यात आले होते.
बैठकीला प्रशासकीय अधिकारी प्रधान सचिव सौ.विनीता वेद सिंगल,कामगार आयुक्त सतिश देशमुख,उपसचिव दादासाो खताळ,अवर सचिव बाबासाहेब शिंदे,बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिव विवेक कुंभार,कामगार उपायुक्त पुणे शैलेंद्र पोळ आदी उपस्थित होते.यावेळी संघटनेचे कॉ.शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार,संदीप सुतार,भगवानराव घोरपडे,विक्रम खतकर,आनंदा कराडे, नुरमहमद बेळकुडे,हणमंत कोळी,ओम पुरी,के नारायण आदी पदाधिकारी उपस्थित होते.