उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये द्या,अन्यथा 2 ऑक्टोबर पासून साखरेच्या गाड्या अडवू,फोडू ; स्वाभिमानीचा इशारा

0
1

सांगली : गत हंगामात गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये द्या अन्यथा 2 ऑक्टोबर पासून साखर वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवू, फोडू असा इशारा निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर सम्राटांना देण्यात आला.गुरुवारी दत्त इंडिया आणि मोहनराव शिंदे कारखान्याला निवेदन देण्यात आले बुधवारी राजारामबापू ,हुतात्मा, क्रांती सोन हिरा विश्वास आदी कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे गुरुवारी दत्त इंडिया कारखान्यावर सर्व कार्यकर्ते जमले कारखान्याचे कार्यकारी संचालक मृत्युजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनात म्हटले गत गाळप हंगाम सुरू झाला त्यावेळी साखर विक्री 31 रुपये किलो या किमतीने होत होती साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने साखर 36 ते 38 रुपये किलो या भावाने साखर कारखानदार विक्री करत आहेत.बाजारात साखर 45 ते 50 या भावाने विकली जात आहे कारखानदारांना 6 ते 7 रुपये प्रति किलो तर क्विंटल पाठीमागे 600 ते 700 रुपये ज्यादाचे मिळाले आहेत.त्यातील 400 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावेत अन्यथा 2 ऑक्टोबर पासून साखर कारखान्यातून बाहेर जाणाऱ्या साखरेची वाहतूक रोखली जाईल गाड्या फोडल्या जातील पेटविल्या जातील हे 400 रुपये संघटना का मागतेय कारण ऊस उत्पादनाचा प्रति टन उत्पादन खर्च 2600 रुपये झाला आहे.

 

खते, वीज, मजुरी, तननाशके, पाणी पट्टी, डिझेल, मशागत,तोडणीसाठी पैसे,एन्ट्री आदींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.खर्च आणि उत्पादनाचा मेळ लागेना झाला आहे त्यातच यंदा दुष्काळी परिस्थतीमुळे ऊस उत्पादन घटले आहे या सर्व बाबीचा विचार करून 400 रुपये द्यावेत अन्यथा साखर वाहतूक रोखणार असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी महेश खराडे,पोपट मोरे, संदीप राकोबा,संजय बेले, बाबा संद्रे,भरत चौगुले, बाळासाहेब लिंबेलाई, धण्यकुमार पाटील, मुकेश पाटील, रोहित पाटील,जगग्नाथ भोसले,आनंद शेटे, प्रकाश पाटील,शंतीनात ली.बेकाई,अभिनंदन चौगुले, बापू सणगर,नंदू नलवडे,उमेश मुळे,पिंटू पाटील, अधिक जाधव आदीसह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here