घाईत नाही,मात्र टिकणारे आरक्षण देऊ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमिका स्पष्ट

0
2
नागपूर : राज्यात आंदोलनानंतर ‌सरकार कडून हालचाली गतीमान झाल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. घाईत निर्णय घेतला आणि तो न्यायालयात टिकला नाही, तर पुन्हा टीका होतील, समाजाला मुर्ख बनवायला तुम्ही निर्णय घेतला,असे आरोप होतील.म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे,न्यायालयात टिकणाराचं निर्णय आहे तो आम्ही घेऊ’, असे स्पष्ट मच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

 

मराठा आरक्षण देणारच. आम्ही त्यांच्या पाठिशी पूर्णपणे उभे आहोत. गंभीर प्रश्न असल्याने तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत, असेही ते म्हणाले. प्रयत्न समन्वयाचा आहे. जे प्रश्न जटील असतात आणि ज्यात संविधान, न्यायपालिका यांचा समावेश असतो त्यात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो न्यायालयात टिकला नाही तर पुन्हा लोकांकडून टीका होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितल्याप्रमाणे टिकणारा निर्णय आम्ही घेऊ, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

तसेच मराठा आरक्षणाचा निर्णयासाठी वेळ होईल, असेच संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे आपले कमिटमेंट सांगितले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देऊ. आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहोत. राज्य सरकार आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे’, असेही फडणवीस यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here