कोयना धरणातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू

0
4

 

पाणी काटकसरीने वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

 

सांगली :  अल्प पर्जन्यमानामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे सिंचन व बिगरसिंचन वापरासाठी कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत धरण व्यवस्थापनास कळविण्यात आले होते. त्यानुसार आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 1 हजार 50 क्युसेक व त्यामध्ये वाढ करून दुपारी 4.30 वाजता दोन्ही युनिटव्दारे एकूण 2 हजार 100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

 

 

ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पिण्याच्या पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजना यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सांगली पाटबंधारे विभागामार्फत प्रसिध्दीपत्रकान्वये करण्यात आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here