समालखा : 76 व्या वार्षिक तीन दिवसीय निरंकारी संत समागमाची भव्यदिव्य तयारी पूर्ण झाली आहे. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पावन छत्रछायेखाली हा दिव्य संत समागम 28, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी संत निरंकारी अध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न होणाऱ्या विशाल निरंकारी संत समागमाचा प्रारंभ आजपासून होत आहे. या अनुपम दिव्य समागमामध्ये देश विदेशामधून सहभागी होणारे लाखो भाविक सज्जन ‘शांती अंतर्मनातील’ याचा परिचय करून घेतील.
समागमाला आलेल्या भाविक सज्जनांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समागमस्थळी एक विशाल सत्संग पंडाल बांधण्यात आले आहे, ज्यामध्ये लाखो भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी सत्संग पंडालमध्ये अनेक एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या असून ज्यामुळे दूरवर बसलेल्या सर्व भाविकांना स्टेजवर होणारा प्रत्येक कार्यक्रम स्पष्टपणे पाहता येईल आणि समागमाचा पुरेपूर आनंद प्राप्त करता येईल. प्रतिदिन आलेल्या सर्व भावीकांसाठी सदगुरु माताजी प्रवचनाद्वारे आशीर्वाद प्रदान करतील आणि उपस्थित लाखो भाविक सज्जन अंतर्मनाच्या शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतील.
प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी निरंकारी प्रदर्शनी आणि निरंकारी बाल प्रदर्शनी सर्व भाविक सज्जनांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून या वर्षीच्या समागमाचा मुख्य विषय ‘शांती अंतर्मनाची’ या विषयावर आधारित आहे.
समागम स्थळ हे चार मैदानामध्ये विभागले आहे. या सर्व मैदानात भाविकांसाठी निवासी मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. लंगरच्या सुविधेसोबतच अल्पोपाहारासाठी 22 कॅन्टीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय व आरोग्य विभागानेही प्राथमिक उपचारापासून उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था केली आहे. याशिवाय, सुमारे 60 देशांतील कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांचे पथकही समागम स्थळावर आपली सेवा देतील. मिशनच्या साहित्या संबधी अधिक माहितीसाठी प्रकाशन विभागातर्फे अनेक स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. भाविकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय रेल्वेने जवळपास सर्व स्थानकांवर येणाऱ्या भाविक सज्जनासाठी सुंदरप्रकारे व्यवस्था केली आहे.
निरंकारी समागम स्थळावर संत निरंकारी मंडळाची विविध कार्यालये, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, समागम कमिटी, सेवादलाचे मध्यवर्ती कार्यालय, वित्त विभाग, पत्र-पत्रिका विभाग, ब्रँच प्रशासन, भवन निर्माण, प्रचार विभाग, प्रेस व प्रसिद्धी विभाग, दूर संचार व रेल्वे आरक्षण केंद्र इत्यादी महत्वाची कार्यालये उभारण्यात आली आहेत.
निसंदेह वार्षिक निरंकारी संत समागम हा आनंदाचा एक पवित्र संगम आहे, ज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे आणि विविध संस्कृतीचे लोक एकत्र येऊन एकमेकांचा आदर सत्कार करून आनंद साजरा करताना स्वतः ला धन्य मानतात.