महावितरणच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दिलासा | आमदारांनी केली ही मागणी

0
14
सांगली : येथे महावितरण, महापारेषण,महानिर्मिती व महाऊर्जा अंतर्गत सांगली जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हा अधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडली.या आढावा बैठकीस विश्वास पाठक स्वतंत्र संचालक एम.एस.ई.बी.होल्डींग कंपनी हे उपस्थित होते.यावेळी जत तालुक्याचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील विविध विजेचे प्रश्न मांडले.
यामध्ये जत तालुक्यातील वीज वितरण यंत्रणांचे बळकटीकारण करणेसाठी जत तालुक्यात 5 नवीन सबस्टेशनची मागणी केली. सध्या अस्तित्वात असलेल्या 8 उपकेंद्राचे क्षमता वाढ करणेत यावी.जत शहरालगत असणारी 12 गावे संख उपविभागीय कार्यालयात जोडली असल्याने या 12 गावातील जनतेला संख येथे जावे लागते.

 

ती गावे जत विभागीय कार्यालयास जोडणेत यावीत.नवीन ऑडिशनल टी.सी.मंजूर करणेत याव्यात.जळालेल्या टी.सी.तातडीने बदलून मिळाव्यात.मागणी केलेल्या कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने वीज कनेक्शन जोडून देणेत यावे.गावठाणातील धोकादायक लाईन शिफ्ट कराव्यात.कामावर असताना अपघाती मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांना न्याय देणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी.या प्रमुख मागण्या आ.विक्रमसिंह सावंत यांनी वीज वितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्याकडे मागणी केली.सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगली जिल्ह्यातील विद्युतविषयक कामांबाबत आढावा बैठक झाली.जत तालुक्यातील विद्युत विभागाची कामे बऱ्याच ठिकाणी प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी विद्युत साहित्यांची डागडुजी करणे यासह नवीन उपकरणे बसवणे देखील महत्त्वाचे आहे.

 

याकरिता लवकरात लवकर पावले उचलून जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर कराव्यात अशी मागणी बैठकीदरम्यान केली. बैठकीस पालकमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे, आ. अरुण लाड तसेच वीज वितरणचे संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here