सर्व पक्षीय नेत्यांच्या हस्ते पाणी पूजन
माडग्याळ : मायथळ येथुन कॅनल द्वारे जाणाऱ्या म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्याचा शुभारंभ सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, गोपीचंद पडोळकर,आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पाणीपुजन करण्यात आले.यावेळी खासदार संजयकाका म्हणाले की, उपमुख्यमंत्री फडवणीस हे म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचे विस्तारीत कामे लवकरच कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करतील. लोकांची पाण्याची मागणी आहे. पाणी मिळाली पाहिजे ही आमची देखील भावना आहे. जरी प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी देखील माडग्याळ येथील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत पुर्व भागात दाखल होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कृषि योजनेतून 2100 हजार कोटी दिल्याने बंदिस्त पाईपमधून पाणी आले.
विलासराव जगताप म्हणाले, म्हैसाळच्या मूळ योजनेकडे दुर्लक्ष नको. विस्तारित म्हैसाळ योजनेला प्राधान्य द्या. म्हैसाळ योजनेतुन 65 गावांना पाणी मिळावे ही लोकांची मागणी आहे. 900 कोटी असलेली विस्तारीत योजना होणे गरजेचं आहे. तालुक्याचा विकास होण्यासाठी म्हैशाळ विस्तारीत होणे गरजेचं आहे.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, आपल्या तालुक्यातील सर्व जमीन ओलीताखाली यावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. सर्व सामाजिक संघटना, राजकीय नेते यांनी पाण्यासाठी अंदोलने, उपोषण केली. अधिवेशनात मी जत तालुक्यातील प्रश्न मांडले. दुष्काळी तालुक्यात जी सवलत मिळायची पाहिजे होते ती मिळाली नाही.
आमदार गोपीचंद पडोळकर म्हणाले, आज आपल्या दारी कृष्णचे पाणी आले आहे. माझ्या पण तालुका दुष्काळी आहे. विस्तारीत योजनेसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. दुष्काळ संपला पाहिजे अशी भावना असणे चालत नाही त्यासाठी काम करावे लागते. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे व उपमुख्यमंत्री फडवणीस हे आपल्याला सर्व काही देतील.
जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले,सन 2018 पासून या कामाचे नियोजन झाले.खासदार संजयकाका पाटील यांना भेटून माडग्याळमध्ये पाणी देण्यासाठी मागणी केली. तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यानंतर संजयकाका पाटील यांनी बारा लाख रुपये दिले. वनविभागाने अडथळा केला परंतु आम्ही प्रयत्न केले आहे. पाच शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली त्यामुळे पाणी मिळाले. त्यामुळे सर्व श्रेय पाच शेतकऱ्यांचे आहे.माजी आमदार विलासराव जगताप यांनी प्रयत्न केले. त्यामुळे माडग्याळमध्ये पाणी मिळाले.विस्तारीत योजना लवकर चालू करावी त्यामुळे वंचित भागाला पाणी मिळेल.
तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्याच्या पूर्व भागातील व्हसपेठ,गुडडापुर,संख,मुचंडी तलाव भरून घेण्याची मागणी संजय काका पाटील यांच्याकडे केली.
विठ्ठल निकम प्रास्ताविक करताना म्हणाले,म्हैसाळ पाण्यासाठी खासदार संजय काका,आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप,प्रकाश जमदाडे व इतर लोकांनी प्रेयत्न केल्याने आमच्या माडग्याळ गावाचे स्वतंत्रपासूनचे स्वप्न पूर्ण झाले.
यावेळी तम्मनगौडा रविपाटील, मन्सूर खतीब ,सचिन निकम यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी रवींद्र आरळी, सरदार पाटील, सुनील पवार, सुरेश शिंदे, प्रमोद सावंत, आण्णा भिसे, भुपेत्र कांबळे, सरपंच सौ अनिता माळी, महादेव माळी, भारत सूर्यवंशी, बाळाप्पा कोरे,अंकुश हुवाळे,सरपंच मुत्तू तेली, उपसरपंच सौ सविता सावंत,सोसायटी चेअरमान प्रदीप करगणिकर , सोमन्ना हाके, लिंबाजी माळी,सरपंच एकनाथ बंडगर, गणी मुल्ला, डॉ प्रकाश सावंत,सोमनिंग बोरामनी, निंगाप्पाकोरे,सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेळी जत पुर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विठ्ठल निकम यांनी तर सूत्रसंचालन सचिन निकम यांनी केले.
पाच शेतकऱ्यामुळे माडग्याळपूर्वसाठी म्हैसाळ पाणी
वनविभागाने काम अडवल्याने शेवटी माडग्याळ मधील भीमराव कांबळे, हरिश्चंद्र हुवाळे, विकास हुवाळे, बाळाप्पा चव्हाण,शिधाप्पा माळी हे पाच शेतकरी पुढे येऊन कॅनल साठी शेतातून जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे आजचा सुवर्ण दिवस बगण्यास दिवस मिळाला.तसेच माडग्याळ,उटगी, सोन्याळ ,उमदीमधील हजारो हेक्टर ओलिताखाली आले.
फोटो ओळ:-माडग्याळ तलावात पाणी दाखल झाल्यावर पूजन करताना खासदार संजय काका पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रकाश जमदाडे, विठ्ठल निकम, सोमन्ना हाक्के,प्रदीप करगणिकर