दरीबडचीत गळफासाने महिलेची आत्महत्या

0
13
दरीबडची : दरीबडची (ता. जत) येथील विवाहितेने वनविभागाच्या जंगलात पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील संखला जाणाऱ्या रस्त्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आश्विनी रमेश गायकवाड (२५) असे विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.
जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरीबडची येथील मृत आश्विनी ही पती रमेश, मुलांसमवेत दरीबडची-संख रस्त्यावर शेतात राहातात.पती रमेश यांचे चौकात सलूनचे दुकान आहे.दहा वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. रात्री जेवण करून झोपले होते. पहाटे उठून अर्धा किमी अंतरावरील घराजवळ असणाऱ्या वनविभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर संखला जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पहाटे पती उठल्यानंतर पत्नी नसल्याचे दिसून आले.बाहेर गेली.असेल म्हणून वाट पाहिली.पती रमेश यांनी शेजारी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली; परंतु मिळून आली नाही. वनविभागाच्या जंगलात रस्त्यावरून जाताना झाडाला मृतदेह लटकतं असल्याचे दिसून आले. यानंतर याबातची माहिती ग्रामस्थांनी गायकवाड कुटूंबियांना दिली.याबाबतची माहिती जत पोलिस ठाण्याला दिली.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, मुलगी आहे. याबाबत नातेवाईक गंगाधर गोपीनाथ खंडागळे
(२८, रा हंगीरगे, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास जत पोलिस करीत
आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here