सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा अखेर बुधवारी निघाला एक रक्कमी 3175 रुपये देण्याचे साखर कारखानदारांनी कबूल केले ही बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडभिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे,या तोडग्यावर समाधानी नाही मात्र ऊस दराची अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे. वजनातील काटामारी,तोडीचे पैसे आणि इथेनॉल वरील बंदी उठविन्यासाठी आमचा संघर्ष असेल,असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती डोडभिसे,पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली,उप जिल्हाधिकारी तृप्ती पाटील,आ. अरुण लाड,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,राजारामबापू कारखाण्याचे उपाध्यक्ष विजय पाटील,आर.डी.माऊली, शरद कदम,आर.डी.पाटील,संतोष कुंभार, संदीप राजोबा,संजय बेले,भागवत जाधव, बाबा सांदरे,अजित हलिगळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे सामजस्याने हा प्रश्न निकालात काढावा अशी विनंती केली.
महेश खराडे म्हणाले,यापूर्वी तीन बैठका झाल्या आहेत मात्र त्या बैठकीत तोडगा निघाला नाही.या बैठकीत तोडगा निघने आवश्यक यापूर्वी कारखानदारांनी 3100 रुपये देऊ असे सांगितले होते.मात्र ते आम्हाला मान्य नव्हते.त्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली आहे.कारखानदारांनी पहिली उचल 3250 रुपये द्यावी अशी आमची मागणी आहे.आ.अरुण लाड यांनी अनेक अडचणी सांगून 3250 देणे शक्य नाही.तोडणी वाहतूक वाढणार आहे.इथेनॉलवर बंदी घातली आहे.त्यामुळे अडचणी वाढल्या आहे.
त्यामुळे आम्ही एक रककमी एफआरपी आम्ही 3175 देवू जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी न ताणता यावर सहमती दर्शवावी असे आवाहन केले.त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून 3175 वर सहमती दर्शविण्यात आली.खराडे म्हणाले,आम्ही 3250 रुपये वर ठाम होतो,मात्र कारखानदार 3150 च्या वर जायला तयार नव्हते.त्यामुळे आम्हाला ही तडजोड मान्य करावी लागली मात्र या पुढेही आमची लढाई सुरूच राहील.