जत : जत येथील प्रसिद्ध डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी यांच्या ‘संत धन्वंतरी शुकदास महाराज’ या पुस्तकाचे प्रकाशन विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर करण्यात आले.मरूळ शंकर स्वामी,विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहते,सचिव संतोष गोरे,डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी,डॉ.संजय धाडकर,दत्तात्रय धाडकर,डॉ.संगीता धाडकर,प्रकाश महाराज जवंजाळ,वाघ महाराज,यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
संतोष गोरे यांनी डॉ.पट्टणशेट्टी यांनी संत-धन्वंतरी शुकदास महाराज पुस्तकात महाराजांच्या जीवनातील सुक्ष्म चिंतन मांडले असून महाराजाच्या प्रत्येक पैलू अक्षरबंध्द करण्याचे कामही डॉ.पट्टणशेट्टी यांनी केले आहे.
सुत्रसंचालन माजी प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके यांनी केले.डॉ.पट्टणशेट्टी यांनी पुस्तकातील सारांश स्पष्ट केला,हे पुस्तक प्रत्येकांना प्रेरणा देईल असे सांगत आभार मानले.कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.