संखमध्ये पाणी परिषद : रक्त घ्या,पाणी द्या,निवडणूकीवर बहिष्काराचा इशारा
संख : जत पूर्वभागातील ६५ गावांसाठी म्हैशाळ विस्तारित योजनेचे टेंडर आठ दिवसात काढा, अन्यथा कर्नाटक सीमेवर जाऊन रक्त घ्या,पाणी द्या मागणी करत आंदोलन करू,आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू,असा ठराव संख (ता. जत) येथील पाणी परिषद व शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. यावेळी कर्नाटकात जाण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी
करण्यात आली.
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते
तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली संख (ता.जत) येथे बुधवार ता.२१ ला पाणी परिषद व शेतकरी मेळावा झाला.प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गुरूबसव विरक्त मठाचे मठाधिपती महेश देवरू होते.यावेळी गुड्डापूरचे संस्थान हिरेमठ श्री श्री श ब्र गुरूपाद शिवाचार्य,सोरडीचे मठाधिपती महंत श्री आनंदगिरजी महाराज,गुरूबसव विरक्त मठाचे मठाधिस महेश देवरू,सिनेअभिनेते गणेश भोसले,उपसरपंच सुभाष पाटील,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, सुरेश पाटील, मनोहर पाटील, राजेंद्र बागेळी, ईश्वर बालगांव, संतोष बिराजदार, बोगीं खुर्दचे सरपंच बसवराज बिरादार,तिल्याळचे उपसरपंच सुरेश कटरे,
कागनरीचे सुभाष मोरे आदी उपस्थित होते.
सिनेअभिनेते गणेश भोसले म्हणाले,पाणी प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र लढावे.तुकाराम बाबा म्हणाले,जत पुर्वमधिल वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून मायथळ कँवॉलपासून व्हसपेठ गुड्डापूर तलावातून, अंकलगी, संख तलावात सायफन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येऊ शकते,बिसल सिध्देश्वरपर्यंत पाणी आले आहे.
गाव बंद ठेवून पाठिंबा
पूर्व भागातील ६५ गावांचा म्हैशाळच्या
पाण्यासाठी ग्रामस्थांनी व व्यापाऱ्यांनी
संख गाव बंद ठेवून पाणी परिषद व
शेतकरी मेळाव्याला पाठिंबा दिला.पाणी द्यावे,अन्यथा आंदोलन तीव्र होईल असाही इशारा यावेळी या बंदच्या निमित्ताने देण्यात आला आहे.
संख ता.जत येथील पाणी परिषदेत बोलताना सिनेअभिनेते गणेश भोसले,तर भोसले यांचा सत्कार करताना हभप तुकाराम बाबा,महेश देवरू, श्री श्री श ब्र गुरूपाद शिवाचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.