जत : पंचायत समिती गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी उत्कृष्ट कामाबद्दल गौरव करण्यात आलेला आहे.जत हायस्कूल जतचे माझी प्राचार्य आदरणीय श्रीपाद जोशी यांनी सरगर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
आप्पासाहेब सरगर म्हणाले मला खुप आनंद होत आहे की आज मला ज्यांनी घडवले शिक्षणाचे बाळकडू दिले ज्यांना मी मनोमनी गुरुचे स्थान देतो त्यांचेकडून माझा सन्मान हा सन्मान नसुन अशिर्वादच आहे यामुळे मी स्वताला भाग्यशाली समजत आहे.हा गौरव माझ्या एकट्याचा नसुन माझ्या पंचायत समितीकडील सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी बंधु भगिनी यांचा आहे त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे असे सांगितले.