विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी करणाऱ्याची पात्रता काय ; गोपाल माळी यांचा सवाल

0
10
उमदी,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यात प्रथमच कमळ फुलायला कारण बनलेल्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनाच पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे,हे दुर्दैवी आहे आणि हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांची पात्रता काय,असा सवाल उमदी शहर भाजपा अध्यक्ष गोपाल माळी यांनी केले.

 

यावेळी गोपाल माळी म्हणाले, जत तालुक्यात नव्हे तर सांगली जिल्ह्यात भाजपचा पहिला आमदार म्हणून स्व. मधुकर कांबळे यांच्या रूपाने माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पुण्याईने मिळाला आहे.जत वगळता जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार म्हणून निवडून आले होते.विलासराव जगताप यांच्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उगम झाले आहे.भाजपकडून सांगली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना देवू नये, त्यांना भाजपाअंतर्गत उमेदवारीला विरोध होता.शिवाय सर्व्हे मध्येही संजयकाका पाटील सफसेल फेल असताना जनमताचा आदर न करता पुन्हा भाजपने संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केले आहे.
गोपाल माळी म्हणाले,आमचे नेते विलासराव जगताप यांनी उमेदवारीला विरोध दर्शविला आहे,त्यास आमचा पाठिंबा असून नेते विलासराव जगताप यांनी जे निर्णय घेतील त्यास आमचा पाठिंबा असेल.भाजपा मधून विलासराव जगताप यांची हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांनी अगोदर आपली पात्रता ओळखून मागणी करावी.जत सारख्या दुष्काळी तालुक्यात प्रथम कमळ फुलविणाऱ्या विलासराव जगताप यांच्याही पंगा घेणे एवढी सोपी गोष्ट नसून जत भाजपाने कठोर निर्णय घेतल्यास भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारीवर नक्कीच परिणाम होणार यात शंका नाही,असेही गोपाल माळी म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here