जनतेच्या मालमत्तेवर संजयकाकांचा डोळा | विशाल पाटील यांची घणाघाती टीका, खानापूर तालुक्यात प्रचार सभांना मोठा प्रतिसाद

0
10

सांगली : खानापूर तालुक्यातील जनतेचा कारखाना संजयकाकांनी विकला. हा कारखाना उभा करण्यासाठी संपतराव नानांनी वसंतदादांचा विरोधही पत्करला होता. कारखान्याची ३०० एकर जमिन ५६ कोटी रुपयांना विकून स्वत:ची मालमत्ता केली. अजून २०० एकर जमीन वैयक्तिक नावावर ठेवली आहे. ही गायरान जमीन सोडविण्यासाठी संजयकाकांना खासदार व्हायचं आहे. शासनाचा, सत्तेचा वापर करून ते गडगंज झाले. जनतेच्या मालमत्तेवर त्यांचा डोळा असतो, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केली.

 

खानापूर तालुक्यातील भाळवणी, मंगरूळ, चिंचणी, बामणी, कार्वे, आळसंद, गार्डी, घानवड, हिंगणगादे, नागेवाडी, चिखलहोळ, माहुली, लेंगरे, खानापूर आदि ठिकाणी प्रचार सभा झाल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी सुशांत देवकर, पद्मसिंह पाटील, राजकुमार माने, माजी नगराध्यक्ष अलीबाबा पिरजादे, माजी नगरसेवक हर्षल तोडकर, भाऊसाहेब मंडले, विराज माने, संभाजी जाधव, डॉ. विजय मुळीक, आनंदराव पाटील, चंद्रकांत जाधव, इंदुमती जाधव, प्रवीण जाधव, अभिषेक शिंदे, उदय थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

विशाल पाटील म्हणाले की, संजयकाकांनी नेहमीच पाण्याचे राजकारण केले. अनेकदा पाणी अडवून स्वत:चा स्वार्थ साधला. खानापूर, घाटमाथ्यावरील जनतेशी त्यांना काहीही देणेघेणे आहे. खानापूरातील कारखाना त्यांनी विकला. हा जनतेचा कारखाना होता. संपतरावनानांनी वसंतदादाचाही विरोध डावलून कारखाना उभा केला होता. कारखान्याची तीनशे एकर जमिन ५६ कोटी रुपयांना विकून स्वत:ची मालमत्ता केली. अजून २०० एकर जमीन नावावर ठेवली आहे. ती गायरानची जमिन आहे. ती सोडविण्यासाठी त्यांना खासदार व्हायचे आहे. संजयकाकांचा डोळा जनतेच्या मालमत्तेवर असतो. अशा व्यक्तीला निवडून दिल्याने जिल्हा दहा वर्षे मागे गेला आहे. दिल्लीत बसून सांगली जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडणारा खासदार हवा. संजयकाकांनी खानापूर तालुक्याचे नाव कधी संसदेतही घेतलेले नाही. दुसºयाच्या कामाचे श्रेय घेण्याशिवाय काहीच केले नाही.

 

मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण देण्याची ग्वाही होती. गतवेळी धनगर समाजाची मते आमच्या मागे जावू नये, यासाठी उमेदवार उभे केला. मराठा आरक्षणाचे आश्वासन दिले होते. पण तेही पूर्ण केले नाही. अशावेळी खासदार कुठे होते. संसदेत त्यांनी मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही मांडले नाहीत. त्यांना दिल्ली गाजविता आलेली नाही. २५ वर्षे सत्तेत असलेल्या खासदार अपक्षावर बोलतो. चंद्रहार पाटीलही खासदारावर काहीच बोलत नाही. संजय राऊतही माझ्यावरही बोलत आहे. मला निवडून दिले तर संसदेत दररोज तुमचे मुद्दे मांडणार. तुमच्या मनातील खासदार, आपलसं वाटणारा खासदार मला व्हायचं आहे.

 

वसंतदादांचे निधन होऊन ३५ वर्षे झाली. तरीही जनता वसंतदादा घराण्यावर प्रेम करते हे पाहून मन भरून आले. जनतेच्या प्रेमाच्या जाणिव मला आहे. वसंतदादा घराण्यात जन्मलो असल्याने एक-दोन शत्रूही असणार. माझ्या संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार, संघर्ष करावा लागणार याची जाणिव आहे मी रडणार नाही तर लढणार कार्यकर्ता आहे, असेही पाटील म्हणाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here