जत : जत नगरपरिषदेचे कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपाच्या माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पांठिबा दिला.आज घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत माजी नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जत शहराच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही विशाल पाटील यांना पांठिबा दिल्याचे सर्व माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले.माजी नगरसेवक परशुराम मोरे,निलेश बामणे,वनिता साळे,निलाबाई कोळी,गायत्रीदेवी शिंदे,मंदाकिनी बेंळूकी,महादेव कोळी, गौतम ऐवळे,शुभांगी बन्नेनवर,भूपेंद्र कांबळे,श्रीदेवी सगरे,अश्विनी माळी,इमरान गवंडी,माया साळे,संगिता माळी,जयश्री शिंदे,स्वप्निल शिंदे,बाळाबाई मळगे,प्रकाश माने,भारती जाधव,शारदा कुंभार,गिरमल्ल कांबळे,जयश्री मोटे,हणमंत कोळी,नामदेव काळे,इराण्णा निडोणी,मुन्ना पखाली,मिथुन भिसे,सुजय शिंदे,साहेबराव कोळी यांनी पांठिबा दिल्याचे परशुराम मोरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान यामुळे जत शहरात विशाल पाटील यांना हत्तीचे बळ मिळाले असून त्याचा विजय निश्चित असल्याचेही परशुराम मोरे यांनी सांगितले.