संखमधील बिराजदार कुटूंबियांना तुकाराम बाबांसह अनेकांनी दिला मदतीचा हात

0
11
जत : जत तालुक्यातील संख येथील साहेबगौडा शिवाप्पा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांची नुकसान झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेत  घरातील सोने, चांदी,रोख रक्कम रेशनकार्ड, धरणग्रस्त दाखला, कागदपत्रे व  संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.या घटनेनंतर बिराजदार कुटूंबिय उघड्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती , श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला. तातडीने घर बांधता यावे यासाठी  एक हजार विटा, जीवनावश्यक वस्तूंची किट, रोख रक्कम  देत मदतीचा हात दिला.
बिराजदार कुटूंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी हभप तुकाराम बाबा यांनी केले होते.
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला.  संख येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य, डबा, ताट,वाटी, मिक्सर, पाण्याची टाकी, ग्लास, जार,कोळपटणी , मिक्सर पासून कुकर आदी साहित्य दिले. बोर्‍याळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील  संसार उपयोगी साहित्याची मदत केली आहे.यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे. तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे. या दुर्घटनेत बिराजदार कुटूंबियांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संख पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हलकुडे, व्हाईस चेअरमन शिवाप्पा पुजारी, सचिव गुरुलिंगप्पा दुगाणी,अशोक कोट्याळ, चंद्रशेखर कळळी, शिक्षक सुभाष बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार, जय हनुमान विद्यालय अंकलगी(ता जत) माजी मुख्याध्यापक सदाशिव उमराणी, बाळकृष्ण टोणे,चन्नाप्पा आवटे, महादेव बिराजदार, रेवणसिद्ध पुजारी, विठ्ठल पुजारी, महेश निगडी, साबू बिराजदार आदी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here