सांगली : श्री.डॉ.विजय सूर्यवंशी,आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, माननीय श्री. प्रसाद सुर्वे संचालक दक्षता व अंमलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांचे आदेशानुसार माननीय श्री. विजय चिंचाळकर साहेब, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, माननीय अधीक्षक श्री. प्रदीप पोटे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली, व माननीय श्री. ऋषिकेश इंगळे साहेब, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली, यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज या कार्यालयाच्या पथका मार्फत दिनांक 18/05/2024 रात्री ठीक 10:30 वाजण्याच्या सुमारास मिरज ते नागज रोडवरील शिरढोण टोल नाक्याजवळ शिरढोण तालुका. कवठेमंकाळ, जिल्हा, सांगली, येथे सापळा रचण्यात येऊन व गाडीचा पाठलाग करून गोवा बनावटीचे अवैधरित्या दारूचे चोरटी वाहतूक करीत असलेले टोयोटा कंपनीचे इटॉस फिकट निळ्या रंगाचे चार चाकी वाहन जिचा क्रमांक MH-03-AZ-5836 या वाहनाचे तपासणी केली असता गाडीच्या डिक्की मध्ये गोवा राज्या करिता विक्रीसाठी असलेले व गोवा बनावटीचे गोल्डन एज या नावाचे 750 मिलीच्या एकूण 348 सीलबंद बाटल्या मिळून आले सदर ची दारू व चार चाकी वाहन मुंबई दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत पुढील तपास कामी जप्त करण्यात आले. व गाडीमध्ये असलेले आरोपीत इसम अनुक्रमे 1. हर्षद नागनाथ जाधव, 2. गणेश अशोक जाधव, दोघेही राहणार पाचेगाव बटुक, तालुका, सांगोला, जिल्हा, सोलापूर यांना ताब्यात घेऊन सदरच्या दारूचे पुढे काय करणार होता याची चौकशी केली असता त्यांनी त्या दारूचे बन बनावट रित्या महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता असणारे रॉयल स्टंग व इम्पेरियल ब्ल्यू या दारूच्या बाटल्यांमध्ये भरणा करून त्याची चोरटी विक्री करणार असल्याचे सांगितले, त्या अनुषंगाने पुढील तपास केले असता त्यांचा एक साथीदार आरोपी क्रमांक 3. संदेश शिवाजी पवार, राहणार पाचेगाव बुद्रुक, तालुका, सांगोला, जिल्हा. सोलापूर, याचे राहते घराचे झाडाझडती घेतली असता तेथे वनावट युचे गोवा राज्या करिता विक्रीस असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता असणाऱ्या रिकाम्या झालेल्या बाटल्या व काही बनावट दारू भरून ठेवलेल्या रॉयल स्टंग व्हिस्की १८० मिलि.च्या वाटल्या मिळून आल्या. असे एकूण रक्कम 8,51,750/- किमतीचे मुद्देमाल मिळून आले. म्हणून तीनही आरोपीत इसमा विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (इ) (ड), 81, 83, 90 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले,
सदरची कारवाई मध्ये श्री. दीपक सुपे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मिरज. श्री. शरद केंगारे, श्री. इरफान शेख, सहाय्यक- दुय्यम निरीक्षक, जवान श्री. संतोष बिराजदार, श्री. स्वप्निल आटपाडकर, श्रीमती. कविता सुपने. आदीनी सहभाग घेतला तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. दीपक सुपे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मिरज. हे करीत आहेत.