नातीचा वाढदिवस साजरा करून परतत असताना भिषण अपघात | एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

0
7
तासगाव : कोकळे ता.कवटेमहाकांळ येथील नातीचा वाढदिवस करून रात्री  तासगावकडे परत येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून अँल्टो गाडी कँनॉलमध्ये आदळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.अँल्टोतील एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीय समवेत अँल्टो कारमधून (एमएच 10 एएन 1497) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी आले होते.रात्री वाढदिवस झाल्यानंतर नात- लेकीसह कुटुंबीया समवेत ते परत तासगावला येत होते. तासगाव नजिकच्या तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्याने  गाडी थेट कालव्यात आदळली.

या भिषण अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 56), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (वय 52), रा. तासगाव, मुलगी प्रियंका अवधूत खराडे (वय 33), नात दुर्वा अवधूत खराडे (वय 5),  दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे ( वय 1), सर्व रा. बुधगाव आणि राजवी विकास भोसले (वय 2) रा. कोकळे यांचा जागीच मृत्यू झाला.तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात मंगळवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास झाला होता. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर तासगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेले. दरम्यान अभिंयते राजेंद्र पाटील हे नात राजवीचा दुसरा वाढदिवसासाठी कोकळे येथे आले होते.कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात राजवीचा ‌वाढदिवस साजरा केला.मात्र वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर नात राजवी सुट्टीसाठी आजोबांच्या समवेत आजोळी जात असतानाच हा भिषण अपघात घडला.पाटील कुंटुबियांचा राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून मंगळवारची रात्र काळरात्र ठरली आहे.या घटनेने तासगाव,कोकळेत शोककळा पसरली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here