थेट मागण्याचे फलक हातात घेऊन जतच्या आमदाराचे आंदोलन | विधीमंडळांच्या सभागृहाबाहेर आ.सावंत यांनी वेधले लक्ष

0
3
जत : जत विधानसभा मतदारसंघातील प्रमुख अडचणी शासनासमोर मांडूनही हे तिघाडी सरकार याबाबत कोणतीच ठोस उपाययोजना करीत नाही. माझ्या जत तालुक्यातील तमाम नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींकडे महायुती सरकार सपशेल डोळेझाक करीत आहे, ही अतिशय लाजिरवाणे व चीड आणणारे आहे.तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण मागण्या या सरकारला ठसठशीतपणे दिसाव्यात आणि त्यांच्या डोक्यात आता तरी प्रकाश पडावा यासाठी विधीमंडळाच्या पायरीवर विविध मागण्यांचे फलक घेऊन उभे राहत सरकारचे लक्ष वेधले आहे,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.

त्यांनी गुरूवार विधासभेच्या पायऱ्यावर मागण्याचे फलक घेऊन आंदोलन केले.महाराष्ट्र सरकारचे ८ (टि.एम.सी.) शिल्लक असलेले पाणी जत तालुक्यास देण्यात यावे.दुष्काळी जत तालुक्याच्या मुळ म्हैसाळ योजनेस रु. १५० कोटी त्वरीत मिळावेत.दुष्काळी जत तालुक्यास नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या विस्तारीत म्हैसाळ योजनेस त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा.जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह त्वरीत मंजूरी मिळावी.जोपर्यंत विस्तारीत म्हैसाळ योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्नाटक सरकारच्या तुबची बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागास पाणी द्यावे.

पूरपरिस्थितीत वाहून जाणारे पाणी म्हैसाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील तलाव भरून देण्यास मिळावे,
अशा मागण्याचे फलक घेत सरकारचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी आ.विश्वजीत कदम, आ.जयंत पाटील,आ.पृथ्वीराज चव्हाण,आ.विकास ठाकरे,आ.भास्कर जाधव, आ.जयंत आसगावकर,आ.यशोमती ठाकूर,आ.राजू आवळे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्या सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीपात्रा मधील पाणी पातळीत वाढ झाली असून केव्हाही पूरस्थिती उद्भवू शकते त्यामुळे दुष्काळी जत मिरज पूर्वभाग कवठेमहांकाळ सांगोला मंगळवेढा या तालुक्यास जीवनदायी असणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना तातडीने सुरू करून दुष्काळी भागातील सर्व तलाव भरून मिळावेत अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज विधानभवना समोर आंदोलन करून केली.

 

दरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याशी बैठक घेत जत तालुक्यातील एकूण परिस्थितीची माहिती घेत सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून तातडीने चर्चा करत जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि टँकरची अवस्था आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी किंवा चार डेपो अशा आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
विधानसभा सभागृहाबाहेर जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मागण्याचे फलक घेत केले आंदोलन
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here