खंडनाळ महिलेचा खूनप्रकरणातील संशयितास अटक

0
5
जत :  खंडनाळ(ता.जत) येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचा घरापासून जवळच असलेल्या विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.इंदुमती पांडुरंग बिराजदार (वय ४० रा. खंडनाळ) असे त्या महिलेचे नाव असून त्यांचा आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे‌ पोलीस तपासात समोर आले आहे.याप्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ वर्षे व्यवसाय ऊसतोडी, रा. खंडनाळ ता. जत जि. सांगली) याने इंदुमतीचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे. संशयित आरोपीस जत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.

 

अधिक माहिती अशी, इंदुमती पांडुरंग बिराजदार यांचा मृतदेह बुधवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका विहिरीत आढळून आला होता. प्रतिक्षा पांडुरंग बिराजदार (वय १७, व्यवसाय शिक्षण, रा. मु. खंडनाळ पोस्ट दरीबडची ता. जत जि. सांगली) हिने याप्रकरणी फिर्याद दिली होती.त्यात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

त्या दृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केला होता,गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती संशयिताची माहिती मिळाली होती.त्यानुसार तम्मा श्रीमंत कुलाळ याच्या मागावर पोलीस होते. पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी कि, दिनांक ९ जुलै रोजी रात्री ८.१५ वा. ते दिनांक १० जुलैच्या ०५.४६ वा. चे दरम्यान तुकाराम यशवंत कुलाळ यांचे विहीरीत यातील मयत नामे इंदु पांडुरंग बिराजदार हिने आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ याचे कडुन चार लाख रुपये उसने घेतलेले होते. ते परत दिले नाहीत म्हणुन संशयित आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ याने मयत इंदु पांडुरंग बिराजदार हिस डोक्यात मारुन ती बेशुध्द झाल्यावर विहीरीच्या पाण्यात टाकून तिचा खून केला होता.

 

गुन्ह्याबाबत माहिती प्राप्त होताच उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे यांनी तपास पथक नेमून योग्य त्या सुचना देवुन आरोपीबाबत माहिती देवुन त्याचे शोध कामी रवाना केले. यातील आरोपी हा गुन्हा केलेपासुन फरार झाला होता. तो महाराष्ट्र- कर्नाटक सिमाभागात राहुन त्याचे अस्तित्व लपवत होता. परंतु तपास पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न चालु ठेवले होते. यातील आरोपी हा मोटेवाडी-पांडोझरी भागात असलेबाबत पोलीस अंमलदार माने यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा कबुल केला असुन आरोपीने यातील मयतास एकुण चार लाख रूपये उसने दिले होते.

 

ते पैसे परत करत नसलेने आरोपी याने मयत इंदु पांडुरंग बिराजदार हिस डोक्यात मारुन विहीरीच्या पाण्यात टाकुन तिचा खून केला असलेचे कबुल केले आहे. गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने आरोपीस अटक करणेत आलेली आहे.अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here