जत : सततच्या प्रयत्नामुळे आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर येथील कृष्णा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होते.परिस्थितीमध्ये या पूर स्थितीमध्ये नदीकाठाची गावे पाण्याखाली जातात.अशा परिस्थितीमध्ये पुराचे वाहून जाणारे पाणी जत,कवठेमहांकाळ,मिरज पूर्व भाग,सांगोला,मंगळवेढा या दुष्काळी तालुक्यासाठी पाणी सोडावे अशी मागणी सतत आ.विक्रमसिंह सावंत करीत असतात.चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यामध्ये समाधान कारक पाऊस झाला नसून पाणी दुष्काळी भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.यासाठी पुराचे वाहून जाणारे पाणी जत तालुक्यास म्हैसाळ योजनेचे पंप चालू करून पाणी सोडावे अशी मागणी विधानसभेमध्ये केली तसेच या मागणीसाठी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले,याची दखल घेऊन कृष्णा नदीचे पुराचे पाणी जत तालुक्यासाठी चालू करणेत आले आहे.