यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप चालू करून दुष्काळी तालुक्यांना पुराचे पाणी सोडल्यास पूरस्थिती कमी होण्यास हातभार लागणार आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग या दुष्काळी भागातील सर्व तलाव बंधारे भरल्यास दुष्काळी परिस्थिती कमी होईल आणि उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही अशी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भूमिका मांडली.