मिरज :जत विधानसभा मतदार संघात भाजपा अतर्गंत जोरदार उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असतानाच माहितीतील घटक पक्ष जनसुराज्यनेही जत विधानसभा मतदारसंघावर दावा करत सांगली जिल्ह्यातील मिरज व जत हे मतदारसंघ आपल्याला सोडावेत अशी मागणी जनसुराज्यचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी भाजपा नेत्याकडे केले जात विधानसभा हा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान आमदार कोरे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडे कोणतीही जागा मागितली नाही. मात्र, विधानसभेला जनसुराज्य पक्षाकडून जागांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.मिरज व जत विधानसभा जनसुराज्य पक्षाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करून या दोन्ही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांकडे केल्याचे विनय कोरे यांनी सांगितले.
दरम्यान जत मतदारसंघ भाजप लढवत असल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच महायुतीतील घटक पक्ष जनसुराज्य पक्षाने जर दावा गेल्याने निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छूक नेत्यांची तिकिट मिळवताना दमछाक होणार हे निश्चित झाले आहे. जतमध्ये भाजपा व जनसुराज्य पक्षाला माननारा मोठा वर्ग असल्याने नेमकी जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.