जत: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबा देवाचे मूळस्थान असलेल्या हिवरे, ता. जत येथील हिवरबनचा रस्ता स्वखर्चाने करून देणार असल्याचे घोषणा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगडा रवीपाटील यांनी केली.
भाजपची जत विधानसभा निवडणूक प्रमुख ताम्मनगौडा रवीपाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा जत तालुक्यातील हिवरे येथे गुरुवारी दाखल झाली. यावेळी हिवरे गावात जनसंवाद सभा घेण्यात आली.
संवाद सभेच्या दरम्यान ग्रामस्थ व महिलांनी विविध समस्या मांडल्या एका महिलेने हिवरे गावचे हिवरबन येथील रस्त्याची झालेली दुरावस्था सांगितले आज मंदिराकडे जाणारा रस्ता दल दल चिखल व झाडेझुडपे यांनी भरला आहे त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेक तक्रारी करूनही या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लक्ष दिले जात नसल्याचे सदर महिलेने सांगितले.
यावेळी तम्मनगौडा रवीपाटील यांनी सांगितले की, मी कोणत्याही वैधानिक पदावर नाही किंवा आमदार ही नाही. परंतु लोकसेवा करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे. हिवरबन येथील बिरोबा देव म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा देवाचे मूळस्थान आहे. या मूळस्थानच्या आपण खर्चाने संपूर्ण रस्ता करून देऊ. पदयात्रेची सांगता झाल्यानंतर जेसीबी पाठवून सर्व झाडेझुडपे काढण्यात येतील. त्यानंतर रस्ता दुरूस्ती करू, अशी घोषणा केली.
उपस्थित महिला व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात तम्मनगौडा रवीपाटील यांचे अभिनंदन केले. एका महिलेने तर जत तालुक्यासाठी असा कर्तबगार आमदार हवा, सर्वांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तम्मनगौडा रवीपाटील यांना आमदार करण्याची शपथ घेऊया अशी शपथ घेतली.