जत : प्रकाश जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.काही अपरिहार्य कारणामुळे मी उद्घाटन कार्यक्रमास येऊ शकलो नाही म्हणून खंत व्यक्त केली.प्रकाश जमदाडे हा तळमळीचे कार्यकर्ता आहे हे 15 वर्षांपासून बघतोय त्यांना तालुक्याची असणारी खडानखडा माहिती,सर्वसामान्य माणसाबद्दल काम करणेची तळमळ ही मी जवळून बघितली आहे.त्यांचेसाठी सर्व शक्ती पणाला लावून जत तालुक्यातील जनतेची सेवा करणेसाठी जे काही लागेल ते मदत करणेची अशी ग्वाही सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना दिली.मी यापूर्वीच भाजपच्या जिल्हा व राज्यातील नेत्यांना सर्व कल्पना दिलेली आहे.
भाजप निश्चितच विचार करेल,तुम्ही काळजी करू नका मी कायम तुम्हा सगळ्याच्या सोबत आहे,असेही खा पाटील म्हणाले.यावेळी अभय जमदाडे, प्रमोद जमदाडे यांनी शाल,श्रीफळ देऊन खा.पाटील यांचा सन्मान केला.यावेळी अमोल डफळे सरकार,रवींद्र सावंत, मोहन भैय्या कुलकर्णी,दिग्विजय चव्हाण, कुलकर्णी,युवराज उर्फ बाळदादा निकम,अविनाश सावंत,अविनाश वाघमारे आमदार,अभिजित चव्हाण,शिवाप्पा तावशी,अविनाश गडीकर,प्रशांत चव्हाण व अनेक मान्यवर उपस्थित होते.