पाकिस्तान हा व्यवसायाच्या बाबतीत जगातील सर्वात वाईट देशापैकी एक आहे. त्यामुळे पाकिस्तानात कोणतीही गुंतवणूक सुरक्षित नाही, याचा पुरावा म्हणजे नुकतीच घडलेली कराचीतील शॉपिंग मॉल लुटीची घटना आहे. परदेशात राहणाऱ्या एका पाकिस्तानी व्यावसायिकाने कराचीच्या गुलिस्तान-ए-जोहर भागात कोट्यवधी रुपये खर्च करून एक आलिशान शॉपिंग मॉल बांधला. पण उद्घाटनाच्या दिवशी आलेल्या गर्दीने शॉपिंग मॉलची दुकानेच लुटली.
परिस्थिती इतकी बिघडली की, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागला. लोकांना आमंत्रित करण्यासाठी मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत कमी पैशांत वस्तू घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मॉलमध्ये पोहोचले. गर्दी वाढत असल्याचे पाहून मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरवाजे बंद केले.