जत, : आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात धुळकरवाडी, मोटेवाडी,आसंगी तुर्क, तिकोंडी,भिवर्गी,जालीहाळ,सिध्दनाथ आदी गावात दाखल झाले आहे.गणेश उत्सवाच्या निमित्ताने जालिहाळ आणि सिध्दनाथ ता.जत येथे तुबची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचे पूजन करणेत आला. यावेळी आमदार सावंत यांनी ग्रामस्थांसह जलपूजन केले.यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत तालुक्यातील दुष्काळाची समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
आमदार सावंत म्हणाले, जत तालुक्यातील ३१,००० हेक्टर जमिनीला या तुबची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचा फायदा होईल.कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. एम.बी. पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे पाणी आले असून त्यांच्या या माणुसकी धर्माने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.असे आ.सावंत यांनी नमूद केले.
यावेळी गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत होते आणि अनेकांच्या डोळ्यांत आनंद पाहायला मिळाला आ. सावंत यांनी २०१९ मध्ये निवडणुकीत मिळालेल्या संधीबद्दल जनतेचे आभार मानले आणि विधानसभेच्या पटलावर जत तालुक्याची ओळख करून दिली व अनेक प्रश्नांना वाचा फोडले असे सांगितले.यावेळी आप्पाराया बिरादार, पिराप्पा माळी,बाबासाहेब तात्या कोडग,मार्केट कमिटी संचालक बिराप्पा शिंदे,भिमगोंडा पाटील,विलास शिंदे,भीमराव माने,गजानन पाटील,कामाण्णा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,मान्यवर,नागरिक,शे तकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिध्दनाथ ता.जत येथे तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेल्या पाण्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.