तू खूप छान दिसतेस, तू मला खूप आवडतेस, असे म्हणते अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी एका औषध विक्रेत्यावर कुडूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. ११ व दि. १३ रोजी दुपारी ३ वाजता सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सदर अल्पवयीन मुलगी ही ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुमारास क्लासवरून घरी येताना वाटेतील एका औषध व्यावसायिकाने तिला बोलावून तू खूप छान दिसतेस, तू मला खूप आवडतेस असे म्हणून हात धरला आणि मोबाइल नंबर घेतला.
तसेच तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने येथील पोलिसांत औषध विक्रेत्याच्या विरोधात फिर्याद दिली.आरोपीला अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकूळ करीत आहेत.
जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न ही घटना अल्पवयीन मुलीच्या घरच्या लोकांना समजताच जाब विचारावयाला गेल्या असता त्या परिसरात मोठा जमाव जमला व संबंधित आरोपीस सर्वजण जाब विचारू लागले. यामुळे काहीकाळ परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, या घटनेची कुणकुण पोलिसांना लागली व तेथे काही पोलिस व अधिकारी तातडीने दखल झाले. जमाव पांगविण्यासाठी खाकीचा हिसका दाखविला. यावेळी नागरिकांमधून पोलिसांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटल्या.