भाजपचे तम्मणगौडा रवीपाटील यांच्या सौभाग्यवतींचा गावागावातील महिलांशी संवाद

0

जत : महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने जत मतदार संघात प्रचाराने वेग घेतला आहे.सर्व इच्छुक उमदेवारांकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळांना भेट देण्याबरोबर महिला मंडळे, कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यावर जोर लावला आहे.दरम्यान भाजपाचे संभाव्य उमेदवार तम्मणगौडा रवीपाटील यांना विधानसभेत पाठविण्यासाठी सौभाग्यवतींनीही महिला मंडळे,वाड्या वस्त्यावरील महिला,हळदी कुंकू समारंभ ,गणेश मंडळांना भेटी देत एकप्रकारे प्रचारात आघाडी घेतली आहे. छोटे मेळावे, बचतगटांच्या महिलांशी चर्चा, पदयात्रा यातून सहभाग नोंदवत आहेत. त्यांच्यासोबत घरातील पाहुणे मंडळीही सहभागी होत असल्याने निवडणूक घोषित होण्या अगोदरच मतदारसंघात चुरस वाढल्याचे चित्र आहे.

रवीपाटील यांच्या बरोबरचं सौभाग्यवतीही प्रचारात उतरल्या आहेत.महिलांच्या छोट्या बैठका, पदयात्रा, मतदारसंघातील गावोगावच्या बचतगटांच्या महिलांशी संवाद साधून आपल्या पतीराजाला विधानसभेत पाठविण्याचा संकल्प रविपाटील यांच्या  सौभाग्यवतीं सावित्री तम्मणगौडा रवीपाटील यांनी केला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.