नेर्लीच्या अनिरुद्धने आईच्या कष्टाच चीज केलं | संपूर्ण भारतातून ३५ वा क्रमांक मिळवित ‘आर्मी लेफ्टनंट’पद पटकाविले

0
अत्यंत कष्टातून व जिद्दीने अनिरुद्ध देशमुख याने वयाच्या पंचवीशीत “आर्मी लेफ्टनंट” पद मिळवित सर्वांना सुखाचा धक्का दिला.आर्मीत अधिकारी होण्यासाठी ज्या-ज्या परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश मिळतो त्यातीलच एक SSC(T)-63 या परीक्षेच्या माध्यमातून अनिरुद्ध संपूर्ण भारतातून ३५ वा येत नेत्रदीपक अस यश मिळविलं.अनिरुद्ध २०२२ साली इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिस्टिंक्शनने पास झाला.लगेचच,त्याला बेंगलोर मध्ये विप्रो या कंपनीत कामाला होता.अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अनिरुद्ध हा नोकरी सांभाळत या परीक्षेची तयारी करत होता.२ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अनिरुद्धने पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशात ३५ वा येत ही अत्यंत खडतर परीक्षा पास केली.अनिरुद्धचा निकाल लागल्या-लागल्या कुटुंबीय,गावकरी,नातेवाईक व मित्रमंडळीच्या आनंदाला अजिबात पारावर राहिला नाही.योगायोगाने निकाल हा अनंत चतुर्दशी दिनीच लागला.आपला अनिरुद्ध मोठा सायेब झाला या आनंदात त्याच्या मित्रमंडळांनी गणपतीच्या विसर्जनाच्या अख्ख्या मिरवणुकीत अनिरुद्धला खांद्यावर घेऊन जल्लोष केला.अनेकांनी शुभेच्या दिल्या.
   
मायेची पाखरण करणारी आई,संकटसमयी धीर देणारी आई,कष्ट करुन मुलांसाठी झिजणारी आई,मुलांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून स्वतःचा विचार न करता जीवाचे रान करणारी आई,अनिरुद्धने मिळविलेल यश हे नक्कीच वाखानण्याजोग आहे.परंतु, अनिरुद्धच्या यशात त्याच्या आईचा संघर्ष हा प्रचंड मोठा आहे.हा संघर्ष मी अगदी जवळून पाहिलाय.अनिरुद्ध व त्याचा लहान भाऊ हे अगदी लहान असतानाच  त्यांच्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं.पतीच अकाली निधन झाल्यावर अनिरुद्धची आई म्हणजेच विद्या देशमुखे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अन् कुटुंबाची जबाबदारी आली.दोन मुल आणि सासू-सासरे यांचा खंबीरपणे आधार त्या झाल्या.
२००६ साली कडेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीत अकाऊंट डिपार्टमेंट मध्ये त्या कामाला लागल्या.तुटपुंज्या पगारातील नोकरीत त्यांनी कुटुंबाचा गाडा पुढे हाकला.सहाएक वर्ष तिथे त्यांनी नोकरी केली.त्यांनी मनोमन ठरवलं होत आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी पोटाला चिमटा काढून मुलांना चांगलं शिकवायचं अन् मोठ करायचं.त्या पगारात भागत नसल्यामुळे  नंतर त्या MS-CIT शिकल्या व एका एनजीओ मध्ये कामाला लागल्या. मुलांना त्यांनी शिक्षणासाठी बाहेर पाठवलं.मुलांनी पण आईच्या परिश्रमाची जाणं ठेवत अभ्यास केला.शिक्षणासाठी बॅंकेच लोन काढल.डोक्यावर कर्ज झालं.परंतु,काहीही झालं तरी डगमगायचं नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधलेली.अनेक संकटे आ वासून उभी असायची परंतु,या खाचखळग्यातून वाट काढीत ,संघर्ष करीत त्यांनी हिमतीने मुलांना शिकविले.
Rate Card
संघर्षातही तिने दिली सुसंस्काराची शिदोरी….
 सुदैवाने डिग्री पासआऊट झाल्यावर अनिरुद्ध विप्रो मध्ये चांगल्या नोकरीला लागला.अन् एक आधार मिळाला.परंतु,तरीही आईच त्याला नेहमी सांगण असायचं की तुला जे आवडतंय ते तू मनापासून कर.त्यात तुझ्या परिश्रमाला नक्की यश मिळेल.आणि ते मिळालही.ही परीक्षा पास अनिरुद्धने यशाचा एक टप्पा गाठलाय.सोबतच,त्यांच्या आईने चांगल्या संस्कारात त्यांना  शिकविल्याने एक चांगला अधिकारी भारतीय सेनेत आपणास पाहायला मिळेल.अनिरुद्धला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा आणि देशमुखे मॅडमच्या संघर्षाला सलाम..!

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.