नववीतील मुलींना दारू पाजून चौघांनी केला अत्याचार | एका संशयिताला पकडले

0
23
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.
नवीच्या वर्गात शिकत असलेल्या दोन
अल्पवयीन मुलींना दारू पाजत पुण्यातील हडपसर परिसरातील त्यांच्या मित्राच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तिघांना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (२०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (२१, रा सावळ, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बारामती न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिलेली माहिती अशी की, १४ सप्टेंबरला दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत; परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. पुण्यात एसटी बसने जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील खोलीवर त्या दोघींना बोलावले. त्यानंतर दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो आणि अन्य एकजण बारामतीतून हडपसरला पोहोचले. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारू पाजून चौघा आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, यातील एका मुलीने हडपसरहून तेथील एका प्रवाशाच्या मोबाइलवरून तिच्या आईला फोन केला. आईने त्यानंतर बारामती पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांशी संपर्क साधत मुलींना ताब्यात घेतले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here