सरकारी काम अन् बारा महिने थांब ही म्हण खोटी ठरवत निफाड कार्यालयात लाडकी तहसील बहीण योजनेसाठी सध्या अनेक महिला कागदपत्र गोळा करण्यासाठी घरचे काम सोडून तासनतास गावातील कार्यालये आणि सांगेल तिथं जाऊन रांगेत ताटकळत उभ्या राहता. झेरॉक्स आणि अन्य कारणांसाठी दमडी दिल्याशिवाय कामच होत नाही हे खरं परंतु या सर्वांना फाटा देत निफाड तहसील कार्यालयाने बिना खर्च हातात दाखला आणून दिला तोही अवघ्या अर्धा तासात.याबाबतचा अनुभव एका ज्येष्ठाने कथन केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक ज्येष्ठ जुन्या रेशनकार्ड मधील आपल्या लेकीचे नाव कमी करण्यासाठी गेला.
कित्येक वर्षांनी तो गेल्याने तो थेट गेलानिफाडच्या जुन्या कार्यालयात. तेथे गेल्यावर त्याला सांगितले की, ते कार्यालय निफाड पिंपळस रस्त्यावर रेस्ट हाऊस जवळ आहे तो ज्येष्ठ पायपीट करीत एक खिडकी योजनेच्या नवीन कार्यालयात पोहोचला. सेतूत गेला इकडून तिकडून फिरफिर फिरला शेवटी एक गृहस्थ त्याला भेटले अन् म्हणाले काही फिरू नका बाबा हा घ्या तहसीलदार साहेबांचा नंबर. बाबाकडे फोनही नव्हता.
आनंदाला नाही उरला पारावार शेवटी त्या भल्या माणसानंच त्याच्याच फोनवरून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना फोन लावून दिला. त्या ज्येष्ठानं त्याच काम त्यांना सांगून नाव सांगितले अन् काय चक्र फिरले कुणास ठाऊक सेतूमधून बाबाचे नाव शोधत एकजण आला. त्याने कागदपत्र घेतले अन् अर्ध्या तासाच्या आत रेशन कार्डवरून नाव कमी करून दिल्याचा दाखला बाबाच्या हातात दिला. त्यावेळी ज्येष्ठाच्या आनंदाला पारावार उरला नाही.