करजगी : उमदी-को.बोबलाद महामार्गावरील धोकादायक वळणे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न होण्याच्या समस्येवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार विक्रमसिंह सावंत यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. वारंवार सूचना देऊनही महामार्ग बनविताना धोकादायक वळणे तयार करण्यात आली. याचा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. या बैठकीनंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले.
धोकादायक वळणे दूर करण्यासाठी आणि पावसाचे पाणी योग्य दिशेने वळविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. संबंधित विभागाने लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत अन्यथा या प्रकरणात कडक कार्यवाही करण्यात येईल असा इशारा यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला.
हा रस्ता जनतेच्या सुरक्षेसाठी असून त्यावर कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणे अत्यंत गंभीर आहे,असेही आमदार सावंत म्हणाले.
उमदी-को.बोबलाद महामार्गावरील धोकादायक वळण,पाण्याचा निचरा होत नसल्याचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष दाखविताना आमदार विक्रमसिंह सावंत