जतला बदलायचे आहे,सक्षम व्हिजन घेऊन मी विधानसभेच्या आखाड्यात | प्रा.राजेंद्र कोळेकर | काहीही होऊदे विधानसभा ताकतीने लढविणार !

0
37
जत : जत विधानसभा निवडणूक मी कोणत्याही स्थितीत कोणीआले तर त्यांच्याबरोबर नाही आलेतर त्यांच्याशिवाय निवडणूक लढवणार हे निश्चित आहे,असे उद्गार उद्योजक प्रा.राजेंद्र कोळेकर यांनी दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना काढले.
मोठ्या ताकतीने व विकासाच्या वेगळ्या योजना घेऊन प्रा.राजेंद्र कोळेकर यांनी जत तालुका पिंजून काढला आहे.ते विधानसभा लढविणार आहेत.मात्र काही दिवसापुर्वी काही घडामोडी घडल्याने ते काय निर्णय घेणार याकडे ‌तालुक्याचे लक्ष लागले होते.मात्र प्रा.कोळेकर यांनी मी निवडणूक लढण्यासाठीच तयारी केली आहे.गावागावापर्यत मी नियोजन सुरु केले आहे.आमचे कार्यकर्ते कामालाही लागले आहेत.त्यामुळे विधानसभा लढविणार व जिंकणार हे निश्चित झाले आहे.येत्या चार दिवसात आमचे तगडे नियोजन दिसेलच.
प्रा.कोळेकर म्हणाले,जत तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून मी सातत्याने काम करत आहे.हे करत असताना मला जतचा रखडलेला विकास अनेक वेळा खटकत होता.या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेलतर एक उच्चशिक्षित,अवभुवी व अभ्यासू आमदार होणे गरजेचे वाटले.त्यामुळेच‌ मी विधानसभेच्या आखाड्यात उतरलो आहे. जत तालुक्यातील विकासापासून वंचित नागरिकांना एक प्रकारे आधार मिळणे गरजेचे आहे.त्यांचे अनेक प्रश्न देश स्वतंत्र झाल्यापासून कायम आहेत.पाणी,रस्ते, वीज यासारख्या समस्या खरे वास्तविकता आत्तापर्यंत संपल्या पाहिजे होत्या मात्र येथील राजकीय उदासीनता असल्याने नागरिकांना आजही सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने करावे लागतात हे दुर्दैव आहे.
विशेष म्हणजे जत तालुका टँकर मुक्त झाल्याचे कागदावर जाहीर होते, मात्र दरवर्षी सुमारे 80 टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.त्यामुळे जनतेचे हाल असह्य झाले आहेत. सातत्याने तालुकाभर ‌चकाचक रस्त्यावर खड्डे पडतात.या खड्ड्यांचे रस्त्यामुळे सातत्याने होणारे अपघात आणि त्यातून अनेक सामान्य नागरिक,कर्तेधर्ते तरुण, अनेकांच्या पत्नी,आई-वडील यांना जीव गमावण्याची वेळ आली आहे.अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.मात्र सातत्याने रस्त्यावर मुलामा केला जातो मात्र मजबूत रस्ते हे जत तालुक्यातील दिवा स्वप्न राहिले आहे.त्यामुळे जतच्या या प्रश्नांना मला वाचा फोडून कायमस्वरूपी लोकांच्या गरजेचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी मला प्रयत्न करायचा आहे.
प्रा.राजेंद्र कोळेकर म्हणाले,जत तालुक्यात देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून आज ही शेतीला हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील तरुणांना कुंटुबांसह ऊस तोडीला जावे लागत आहे.गाव,नातेवाईक आई-वडील,लहान मुले सोडून जमिनी असताना सुद्धा तरुण शेतकरी हातात कोयते घेऊन राबतानाची चित्र असह्य करते,त्यामुळेच हे चित्र बदलायचे आहे. सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जत तालुक्यातील जत नगरपरिषद,डफळापूर,उमदी बिळूर, शेगाव संख,माडग्याळ अशा मोठ्या गावांचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच तालुक्यातील छोटी मोठी गावे,वाड्यावस्त्या, तांडे सुधारून याद तालुक्याला नव्या विकास प्रवाहात आणायचे.अशा योजना राबवण्याचा माझा मानस आहे.जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना आपला आपला हक्काचा आमदार वाटला पाहिजे असे काम मी करणार आहे.प्रशासकीय काम असो,किंवा ग्रामपंचायत स्तरावरचं काम असो किंवा अन्य कोणतेही काम चुटकीसरशी झाले पाहिजे अशी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करणार आहे.जेणेकरून प्रत्येक सामान्य माणसाचे हाल होणार नाही.मी जतला नवी दिशा देण्यासाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरलो आहे.जत तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मला मोठ्या संख्येने विजयी करावे,असे आव्हानही प्रा.कोळेकर यांनी केले आहे
येत्या आठ दिवसात स्पष्ट करणार
मी भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे.त्यांनी तिकीट दिले नाही तर माझ्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असून अंतिम क्षणी कोणत्या पक्षातून लढायचे हे मी आठ दिवसात जाहीर करणार आहे.कोणी काही केले तरी मी विधानसभा निवडणूक मोठ्या ताकतीने लढणार हे निश्चित आहे,असेही प्रा.कोळेकर म्हणाले.
अभ्यासू,उच्चशिक्षित आमदारचं जतला बदलू शकतो
जत तालुक्यात अभ्यासू,हुशार,उच्चशिक्षित,विकासाचे व्हिजन असणारा आमदार हवा आहे. अशा लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या आमदारांची गरज आहे.मी जत शहरात मोठे गृहप्रकल्प उभे करून अनेक नागरिकांना सर्व सुविधा युक्त घरे मिळतील असा उद्योग उभारला आहे.येथे हक्काचे व कोणत्याही कटकटीशिवाय घर मिळते. त्या धरतीवरच जत तालुक्यातील महिला, तरुणांना हक्काचे काम मिळेल असा मोठा उद्योग उभारण्याचा माझा मानस आहे. असेही प्रा.कोळेकर म्हणाले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here