दाखल तक्रारीनुसार कामगार प्रांजल येळे (सध्या रा. जिरग्याळ) याने जिग्याळ गावी महालिंगेश्वर दूध डेअरी व चिलिंग सेंटरचे डेअरीच्या आतील व बाहेरील तीन सीसीटीव्ही कॅमेरे फोडून व वायरी तोडून नुकसान केले. शटरचे कुलूप चावीने काढून आत प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉव्हर फोडून त्यातील ८० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारुती पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.