जत : जत मतदारसंघात आज सुमारे ७ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ सुरू झाला. या कामांच्या पहिल्या टप्प्यात चार गावांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या सहकार्यामुळेच मतदारसंघाच्या विकासाची वाटचाल शक्य झाली आहे. मतदारसंघाचे नंदनवनात रूपांतर करणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याचा विश्वास यावेळी उपस्थित ग्रामस्थांसमोर व्यक्त केला.
याप्रसंगी भूमिपूजन झालेली विकासकामे: मौजे निगडी येथे बाळासाहेब सावंत यांच्या घरापासून संतोष सावंत यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ८ लाख.मौजे अचकनहळळी येथे बिसल सिद्धेश्वर ते निगडी रस्ता विकास ५ कोटी.मौजे येळवी येथे ओंकारस्वरूप चौक ते कोळी गल्ली रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे – १० लाख.मौजे वायफळ येथे विठ्ठल मंदिर परिसरात सभामंडप बांधणे १५ लाख.