अबब..जत‌ तालुक्यात ५३ लाखाचा गांज्या ‌जप्त | ऊस,मका, तुरीच्या शेतात केली होती लागवड

0
16
जत : तालुक्यातील बिळूर व डोर्ली येथे ऊस व मका, तुरीच्या पिकात छापा टाकून ४७८ किलो गांजा जप्त केला. बिळूर येथील गांजाची ४७ लाख ३० हजार तर डोर्ली येथील गांजाची ६ लाख अशी एकूण ५३ लाख ३० हजार इतकी किंमत होते.

 

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी केली. सोमवारी बिळूर येथे दुपारी कारवाईस सुरुवात केली होती. याप्रकरणी बिळूर येथील गुरुवसू भावीकट्टी व डोर्लीतील मारुती रामा रुपनर आणि त्याचा चुलत भाऊ विठ्ठल कृष्णा रुपनर या तिघा संशयितांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील मारुती रुपनर याला अटक करण्यात आली, तर दोघा संशयितांनी पलायन केघले
उपविभागीय पोलिस अधिकारी साळुंखे यांनी अवैध व्यवसाय बेकायदाशीर गांज्या‌ लागवडीवर कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस निरिक्षक सुरज बिजली यांच्या पथकाने भावीकट्टी याच्या तुरीच्या शेतात छापा टाकून ४७२ किलो ३४३ ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांच्या छाप्याची चाहूल लागताच संशयित भावीकट्टी याने पलायन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बिजली पोलिस उपनिरीक्षक जीवन कांबळे, विश्वंभर पोटे, वहिद मुल्ला यांनी केली.
तसेच डोर्ली येथे मारुती रुपनर यांनी मक्याच्या पिकात व त्याचा चुलत भाऊ विठ्ठल रुपनर यांच्या ऊस पिकात गांजाची लागवड केली होती. पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील व्हनखंडे व पोलिस अंमलदार एवळे यांनी रूपनर याच्या मक्याच्या व उसाच्या पिकातील गांजा लागवडीवर छापा टाकला. गांजाची झाडे जप्त करून वजन केले असता, ६० किलो गांजा मिळून आला. तसेच घरासमोरील गोठ्यात वाळलेला गांजा आढळला. या गांजाची किंमत ६ लाख रुपये होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here