६५ गावांना म्हैसाळ विस्तारित योजनेतून कसे मिळणार पाणी | कसा आहे आराखडा,आमदारांनी दिली सविस्तर माहिती

0
54
विस्तारितमधून ६५ गावांमध्ये पाणी पोहचविण्यासाठी व्यापक आराखडा
जत : म्हैसाळ-जत विस्तारित उपसा सिंचन योजनेची महत्वाकांक्षी बैठक नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. या योजनेमुळे संपूर्ण ६५ गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून, गावागावांमध्ये जलसिंचनाचा फायदा पोहोचवण्याची मोठी योजना आखण्यात आली आहे.
या योजनेचे सादरीकरण करण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली लाभ क्षेत्रातील गावातील लोकप्रतिनिधी व प्रमुख शेतकऱ्याच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत सादर करण्यात आलेल्या सादरीकरणात (PPT) योजनेखाली येणाऱ्या क्षेत्राची आणि लाभधारकांची विस्तृत माहिती दिली गेली.
सुमारे २००० कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर करण्यात आला असून, तो टप्याटप्याने मिळत आहे. या निधीच्या सहाय्याने जलसिंचनाचे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि योजनेचा लाभ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळेल. यामुळे गावागावांत शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.
या योजनेमुळे सिंचनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल आणि परिणामी शेतीची उत्पादकता व गुणवत्तेत लक्षणीय वाढ होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि आर्थिक समृद्धी या योजनेमुळे निश्चितपणे उंचावेल,असे यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here