सांगलीत भाजपचा उमेदवार तरी कोण?

0
10

जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांतील लडतीचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा गोंधळ कायम आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने पक्षासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे. पक्षाने बैठकांचा सपाटा लावला असला तरी कार्यकर्ते गोंधळलेले दिसत आहेत.

 

इच्छुक असलेल्या भाजपमधील नेत्यांची नावे अनेक असली तरी नेमका उमेदवार कोण, याचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना उमेदवारीबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. विरोधी काँग्रेसमध्ये दोन इच्छुक असले तरी त्यांनी निवडणुकीची तयारी फार पूर्वीपासून केली आहे. भाजपची अद्याप तयारी नसल्याची खंतही काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त्त केलीय म्हणे, आमदार गाडगीळ यांना निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरविण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा आग्रह कायम आहे. ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील, अशी आशाही अनेकांना आहे. मात्र, गोंधळ संपलेला नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here