भाजपकडून नेत्यांची फौज उतरणार प्रचारात

0
2

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची फौजच उतरवण्याच्या तयारीत आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली.

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत विरोधकांना घेरण्यासाठी चक्रव्यूह निर्माण करण्यावर चर्चा झाली. तसेच विरोधकांचे नॅरेटिव्ह उखडून काढण्यासाठी आणि विरोधी पक्षांवर दबाव ठेवण्यासाठी रणनीती आखण्यात आली.

देशभरात भाजपचे १३ मुख्यमंत्री आणि १६ उपमुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयमध्ये एनडीएचे सरकार असून इतर पक्षांचे मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते.पंतप्रधान मोदींसह विविध राज्यांचे नेते, राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री महाराष्ट्र आणि झारखंडच्या उतरतील.

एनडीएची एकजूट : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी सोहळ्यात सर्व विरोधी पक्षांचे नेते एकजूट दाखवण्यासाठी श्रीनगरला गेले होते. त्यानंतर एनडीएची एकजूट दाखविण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावली आहे. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला संरचित अजेंडा ठरवण्यात आला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here