पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्याविरुद्ध भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात मुख्य लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे. रिंगणातील ११ उमेदवार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे : संग्रामसिंह देशमुख (भाजपा), डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस), आनंदा नालगे (बळीराजा पार्टी), अंकुश पाटील (जनहित लोकशाही पार्टी), जीवन करकटे (वंचित बहुजन आघाडी), अर्जुन जमदाडे (अपक्ष), शकुंतला पवार (अपक्ष), परशुराम माळी (अपक्ष), जयसिंग थोरात (अपक्ष), हणमंत होलमुखे (अपक्ष), अशोक चौगुले (अपक्ष).
अर्ज मागे घेतलेले उमेदवार त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे
व रंगराव पाटील (अपक्ष), विजय यादव (अपक्ष), राहुल पाटील (अपक्ष), प्रदीप कदम (अपक्ष), विशाल पाटील (अपक्ष), प्रमोद जाधव (रिपब्लिकन बहुजन सेवा), विश्वनाथ कांबळे (अपक्ष), रवींद्र ठोंबरे (अपक्ष), महादेव होवाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए).