घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनविले इलेक्ट्रिक वाहन

0
123

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग  विभागाने इलाईट टेक्नो ग्रुप, पुणे च्या सहकार्याने इलेक्ट्रिक वाहन सक्षम कार्यशाळा घेतली. यात बी.टेकच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत दोन एलेक्ट्रिक वाहन बनविले.घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नव उद्योगासाठी प्रेरित करण्याचे धोरण ठरविले आहे. या अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली.

यामध्ये इलेक्ट्रिक वाहन डिझाईन करणे, बांधणी व चाचणी करणे इ. प्रशिक्षण देण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक वाहन बनवले व त्याची चाचणी देखील घेण्यात आली.याबाबत अधिक माहिती देताना विभाग प्रमुख डॉ. स्वप्नील हिरीकुडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन, समर्पित होऊन हा प्रोजेक्ट केला आहे.

अशा कार्यशाळामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.यासाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन, संचालक, विभाग प्रमुख,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्यपूर्ण उमेदवार तयार करणे हे आमचे ध्येय आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी पेट्रोल व  इलेक्ट्रिक वाहनांचे एकत्रीकरण कसे करता येईल यावर प्रयोग करावा.

-संजय घोडावत,अध्यक्ष

फोटोओळीविद्यार्थ्यांच्या इलेक्ट्रिक वाहनाला संजय घोडावत यांनी निशाणी दाखवत शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, विद्यार्थी व प्राध्यापक 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here