जत विधानसभा मतदार संघामध्ये बुधवार दिनांक २० रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली.आज ता.२३ ला मतमोजणी होत आहे.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजयकुमार नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जतमध्ये जूने धान्य गोडावून येथे मतमोजणी सुरु आहे.
उमेदवार निहाय चौदावी फेरीतील मतदान
१) आमदार गोपीचंद पडळकर : ७४७१०
२) आमदार विक्रमसिंह सावंत : ५०२८८
३) तम्मणगौडा रवी पाटील : १४२५७
आमदार गोपीचंद पडळकर यांना आघाडी : २४४२२
जत विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २९१३६३ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार हे १५२४०९ असून स्त्री मतदार हे १३८९५१ मतदार आहेत असून इतर ३ मतदार आहेत. काल झालेल्या सकाळी ७.०० ते ६.०० च्या दरम्यान एकूण २१०९०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १११७८० पुरुष,९१११९ स्त्री तर इतर १ अशा एकूण २,१०,९०० मतदारांनी आपला मतदाना हक्क बजावला आहे. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी ७२.३८ आहे.
जत विधानसभा मतदार संघात, महायुती कडून आमदार गोपीचंद पडळकर, महाविकास आघाडी कडून आमदार विक्रमसिंह सावंत तर तम्मणगौडा रवी पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तिन्ही तुल्यबंळ उमेदवारामुळे मोठी चुरसीने मतदान झाले होते. तालुक्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले.