सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचा (बापू) यांचा पराभव झाला. शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. आबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी झाले आहेत.
दीपक साळुंखे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता, गणपतराव देशमुख या निवडून गेले होते. खुद्द शहाजी पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात ६ वेळा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. २०१९ ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.
पुन्हा मिळविले वर्चस्व
यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी १ लाख १६ हजार २८० मते घेत शहाजी पाटील यांचा २५ हजार ३८४ मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.