जत : एकुंडी ता.जत येथील ग्रामदैवत श्री यल्लम्मादेवी यात्रा १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान भरणार असल्याचे माहिती ट्रस्टचे विश्वस्त बसवराज पाटील यांनी दिले.
शुक्रवार १३ रोजी श्रीचा नैवेद्य शनिवार १४ रोजी किचाचा दिवस व रविवार १५ रोजी पौर्णिमाला मंदिराचा दरवाजा उघडणेचा कार्यक्रम आहे. नैवेद्याच्या दिवशी श्री रेणूका महात्मे हा कन्नड नाटकच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.