भाजपचे काही कार्यकर्ते पक्षीय हालचालींची बारीक माहिती असल्याचा आव आणत असतात.
जिल्ह्यात भाजपच्या किती जागा येणार यावर पैजा लावून उत्साहाचा परमोच्च बिंदू गाठलेल्या काही कार्यकर्त्यांनी आता मंत्रिपदावर पैजा लावल्या आहेत. भाजपचे सर्वच म्हणजे चारही आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा रंगली.
मिरजेचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ अन् जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. या तिन्ही नेत्यांपैकी कोणाला आमदारकी मिळेल, यावरून पैजा लागल्या आहेत. डावावर दुचाकी व चारचाकी लागली आहे. काहींनी केवळ जेवणावळीचा बेत आखला आहे. सत्ता स्थापनेनंतर आता जिल्ह्यात कोणाला मंत्रिपदे मिळणार यावर जागोजागी चर्चा रंगत आहेत. आणि पैजाही लागत आहेत.