तीन लाखाची लाच घेताना आरटीओला पकडले

0
387

कोल्हापूर, सातारा, सांगलीतील घरांची झडती

वाहन निरीक्षकाच्या बदलीसाठी खासगी पंटरच्या माध्यमातून ३ लाखांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याची नवापूर चेकपोस्टवर बदली करण्याच्या मोबदल्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकासोबत संपर्क साधला. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

तक्रारदाराच्या घरी जाऊन घेतले पैसे….

गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता तक्रारदाराच्या जळगावातील घरी भिकन भावे हा लाच स्वीकारण्यासाठी गेला आणि त्याला छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. खासगी पंटर भिकन भावे याने प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती पथकाने दिली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे येथील घरांची झाडाझडतीदेखील एसीबीचे पथक घेत असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here