जत : लाडकी बहीण योजनेमुळे सत्ताधारी मंडळींना निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता या लाडक्या बहिणींचे कायमस्वरूपी आर्थिक, मानसिक, सामाजिक संरक्षण करण्यासाठी खंबीर भाऊ किंवा सक्षम भाऊ योजना पुरुषांसाठी सुरू करावी, अशी मागणी पुरूष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष अँड.बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
शासनाने खंबीर भाऊ किंवा सक्षम भाऊ योजनेत कोणत्याही पुरुषाला दरमहा आर्थिक भीक देऊ नये, तर होतकरू, गरीब, निर्व्यसनी आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व पुरुषांना व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी एक रकमी आर्थिक मदत राष्ट्रीयीकृत बँकांकडून केवळ एक कर्ज मागणी अर्जाद्वारे द्यावी. विनातारण, विना जामीन कर्ज योग्य कागदपत्रांच्या आधारे अत्यल्प व्याजदरात किंवा बचत खात्याच्या व्याजदरात उपलब्ध करून द्यावे. पहिले ५० टक्केपर्यंतचे कर्ज फेडीचे हप्ते खंबीर भाऊ स्थिर होईपर्यंत शासनाने फेडावे.
कर्जाला शासनाने विमा संरक्षण द्यावे.सक्षम भाऊ योजना अंमलात आणली तर लाखो बेरोजगार, होतकरू तरूणांना तसेच भांडवल नसल्यामुळे पिचलेल्यांना याचा फायदा होईल. य योजनेची प्रभावी अंमलबजावण करण्यासाठी निरीक्षक किंवा मार्गदर्शन नियुक्त करावेत.
लाडक्या बहिणींचे भाऊ, भावोजी पती, वडील आदी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर राज्यातील करोडो तरूणांच बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, खंबीर भाऊ योजना अंमलात आणताना राज्यात महिला आयोगाप्रमाणे राज्य पुरुष् आयोग देखील स्थापन करावा. तसेच विशाखा सारख्या समित्यांमध्ये एक पुरूष सदस्यही नियुक्त करावा, अर्श मागणी अँड. बाळासाहेब पाटील यांन केली आहे.