नवीन प्रशासकीय कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ; स्टॅम्प विक्री रजिस्टर दुय्यम निबंधकांकडे जमा
जत : जत येथील स्टॅम्प विक्रेत्यांना स्टॅम्प विक्रीसाठी नविन प्रशासकिय इमारतीत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासन चालढकल करित असल्याने मुद्रांक विक्रेत्यांनी बेमूदत बंद पुकारल्याने पक्षकारांची मोठी गैरसोय झाली आहे.
जत येथील मोरे काॅलनी ,कोडग काॅम्प्लेक्स येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे लवकरच नविन प्रशासकिय ईमारतीमध्ये सुरू होणार असून दुय्यम निबंधक कार्यालय अखत्यारीतील मुद्रांक विक्रेते(स्टॅम्पव्हेडर) यांना नविन प्रशासकिय इमारतीत बसण्यासाठी जागा नाही.प्रशासकिय ईमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने स्टॅम्प विक्रेत्यांना याठिकाणी स्टॅम्प विक्रीसाठी जागा मिळावी यासाठी स्टॅम्प विक्रेत्यांनी प्रशासकिय इमारतीचे बांधकाम सुरू करण्याच्या अगोदरपासून जागेसाठी पाठपुरावा केला आहे.
जत येथील मुद्रांक विक्रेते हे या पूर्वी नविन प्रशासकिय इमारतीचे बांधकाम होण्यापूर्वी त्यांच्या हक्काच्या मुद्रांक विक्रेत्यासाठी असलेल्या बंदिस्त जागेवर बसून स्टॅम्प विक्री व खरेदी दस्ताची कामे करित होते.परंतु नविन प्रशासकिय ईमारत बांधकाम करताना सबंधिताकडून मुद्रांक विक्रेत्यांची हक्काची जागा असलेले हे बंदिस्त पत्राशेड पाडून त्याठिकाणी महसुल खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची चारचाकी व दूचाकी वाहन पार्कींगसाठी शेड बांधून मुद्रांक विक्रेत्यांवर मोठा अन्याय केला आहे.त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
जत येथील मुद्रांक विक्रेत्यांना नविन प्रशासकिय इमारत परिसरात मुद्रांक विक्रीकरिता जागा उपलब्ध करून मिळावी यासाठी आज तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी आपली सर्व मुद्रांक विक्री रजिस्टर दुय्यम निबंधक अधिकारी श्री.राहूल हंगे यांच्याकडे जमा केली असून जो पर्यंत मुद्रांक विक्रेत्यांच्या जागेसंदर्भात निर्णय होत नाही तो पर्यंत जत तालुक्यातील मुद्रांक विक्री बंद असल्याने याचा परिणाम शासनाच्या महसुलावर होणार असलातरी सर्वच पक्षकारांना विविध कामासाठी लागणारे मुद्रांक जत तालुक्यात मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
तालुक्यातील सर्वच मुद्रांक विक्रेत्यांनी जोपर्यंत आपणाला नविन प्रशासकिय ईमारत परिसरात मुद्रांक विक्रीसाठी जागा मिळणार नाही तोपर्यंत आपण मुद्रांक विक्री रजिस्टर परत घेणार नाही असा निर्धार केल्याने जत तालुक्यातील पक्षकारांना मुद्रांक खरेदी करण्यासाठी जवळच्या कवठेमहांकाळ सांगोला,मंगळवेढा या ठिकाणावरूण मुद्रांक आणावे लागणार असल्याने याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.